Share

‘तू तिथे मी’; लग्नाच्या २० व्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेने शेअर केली खास पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत बायोपिकचा ‘बादशहा’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोध भावेने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बायोपिकमध्ये उत्तम भूमिका बजावल्या आहेत. सुबोधने आतापर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक, बालगंधर्व यांच्या बायोपिकमध्ये काम केलं आणि प्रेक्षकांनी सुबोध भावेंच्या या भूमिकांना प्रचंड पसंती दिली आहे. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी स्वतः ची अशी एक खास ओळख निर्माण केली आहे. या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, यानिमित्त सुबोधने एक खास पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CRN2onzh0_Q/?utm_medium=copy_link

अभिनेता सुबोध भावेची पत्नी मंजिरी भावे यांच्या लग्नाच्या २० वा वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर लग्नाचे काही फोटो शेअर करत सुबोध भावेने लिहिले की, ‘लग्नाच्या २० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… खूप काही न लिहिता ‘तू तिथे मी’ इतकंच” असं कॅप्शन देत त्याने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता सुबोध भावे मराठीमधील एक उत्कृष्ट अभिनेता समजला जातो. नाटक, मलिका असो किंवा चित्रपट सुबोधने प्रत्येक माध्यामतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सुबोधने विविध धाटणीच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनामध्ये आपलं एक स्थान निर्माण केल आहे. तर पत्नी मंजिरी एक निर्माती आहे. मंजिरीने सुबोधच्या प्रत्येक यश-अपयशात त्याची साथ दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!