नागपूर:केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा आरोप केला आहे. त्यांनी याबाबत हायकोर्टातयाचिका दाखल केली आहे. ‘नाना पटोले यांच्या निवडणूक याचीकेतील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर’, अशा आशयाचा अर्ज त्यांनी दाखल केला आहे.
दरम्यान यापूर्वी पटोले यांनी नितीन गडकरींवर आरोप केले होते. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत गडकरी नागपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्नाचा स्त्रोत शेती म्हणून नमूद केले होते. तसेच त्यांनी नियमांचे तसेच तरतुदीचे पालन केले नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
त्यामुळे नागपूर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात यावी, तसेच गडकरी यांची निवड रद्द करण्यात यावी. अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती. यानंतर आता नितीन गडकरी यांनी पटोले यांच्यावर निवडणूक प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यांनी याद्वारे पटोले यांना प्रतिउत्तर दिले असल्याचेदेखील बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

