🕒 1 min read
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. चेन्नईला पोहोचताना पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर एम.ए. चिदंबरम स्टेडियमजवळून उडत असताना त्यांनी हवेतूनच भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे दृश्य टिपले. पीएम मोदींनी आपल्या ट्विटर हँडलवर स्टेडियमचे चित्र लगोलग शेअरही केले. या फोटोत क्रिकेटपटू पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. ट्विट करताना पंतप्रधानांनी लिहिले की, त्यांनी या मजेदार सामन्याचे दृश्य आकाशातून पाहिले.
मोदींनी हे छायाचित्र आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या ८० दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे, ते मात्र मोदींना दिसलं नाही अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.
‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अगोदर अडीच महिन्यांपासून देशभरातील शेतकरी दिल्ली च्या सिमेवर आपल्या न्यायिक मागण्या व हक्का साठी बसलेले आहेत… ते तुम्हाला दिसत नाही काय??’ असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे स्वीकारल्यानंतर नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे.
प्रधानमंत्री @narendramodi जी अगोदर अडीच महिन्यांपासून देशभरातील शेतकरी दिल्ली च्या सिमेवर आपल्या न्यायिक मागण्या व हक्का साठी बसलेले आहेत… ते तुम्हाला दिसत नाही काय?? https://t.co/ko7w4RktkV
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 14, 2021
नरेंद्र मोदींचा चेन्नई दौरा –
पंतप्रधान मोदी रविवारी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी राज्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पसची पायाभरणी केली. चेन्नईजवळील थियूर येथे हा परिसर तयार केला जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे 2 लाख चौरस मीटर क्षेत्रामध्ये या कॅम्पसच्या बांधकामासाठी 1000 कोटी रुपये खर्च येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील मेट्रो रेल फेज -1 विस्ताराचे उद्घाटन केले आणि वॉशरमेनपेट ते विमकोनगरपर्यंत प्रवाशांच्या सेवेस हिरवा झेंडा दाखवला. यासह त्यांनी चेन्नईमध्ये 293.40 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या ‘चेन्नई बीच आणि अट्टीपट्टूदरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले.
महत्त्वाच्या बातम्या
- भारताची कसोटीवर पकड ! दुसऱ्या दिवसाखेर एक बळी गमावून देखील भक्कम स्थिती कायम
- ‘…म्हणूनच “जेल पर्यटन” चालू केले असावे! जनता मंत्र्यांना अजुन कुठे भेटणार ?’
- ‘कोरोनामुळे अनेकांनी जवळची लोकं गमावली, त्यामुळे शिवजयंती…’
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणालाही पाठीशी घालणार नाहीत; संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- ‘रोहिणी खडसे यांचे जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
