🕒 1 min read
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेचा अध्यक्ष निवडणुकीच्या नियम बदल करण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत नियम समितीने एक शिफारस केली आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशात खुल्या मतदान पद्धतीने सर्व विषय हाताळले जातात. तशी अध्यक्षाची निवड व्हावी. यासाठीची शिफारस सभागृहाकडे दिली होती. यासंदर्भांत सरकारने राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांना पत्राद्वारे निवेदन दिले होते.
मात्र राज्यपालांनी आवाजी मतदान करत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निर्णयाला विरोध केला. यावरुन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
अध्यक्षपदाबाबत राज्यपाल यांना पत्र पाठवून संपूर्ण प्रक्रिया कळवण्यात आली होती. ‘राज्यपालपदाचा कुठेही अपमान होणार नाही याची काळजी सरकारने घेतली होती. अध्यक्षपदाची संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात पार पाडता आली असती परंतु शेवटच्या दिवशी सकाळी राज्यपालांनी पुन्हा पत्र पाठविले. त्यामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली. राज्यपालांनी राजकारण करु नये. राज्यपालांकडे सांविधानिक पद आहे त्यांनी त्या पदाचा मान राखावा ’ असे नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, दिल्लीतील सरकार आमचे कोणाचेही ऐकत नाही. आम्ही लोकशाही मानतो लोकांची मतं जाणून घेतो. मात्र भाजपचे काही लोक राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करत आहेत. मात्र, अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. लोकशाहीचे महत्व न मानणारे भाजपचे नेते भ्रमित झाले आहेत. भ्रमित झालेल्या लोकांच्या तोंडाला फार लागायचे नसते, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना चांगलेच सुनावले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- “दिल्लीला पळून जाण्याचं बळ कोंबडीच्या पंखात नसतं”
- उपसभापती गोऱ्हे यांच्याविरोधात दरेकरांनी मांडला अविश्वास ठराव
- 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परिक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुढील तारीख लवकरच होणार जाहीर
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

