🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा परिक्षेबाबत आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एमपीएससीची परिक्षा येत्या 2 जानेवारीला होणार होती. ही परिक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षांची नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनामुळे याआधीही अनेकदा परीक्षा लांबणीवर गेल्या आहेत, राज्यात सध्या ओमिक्रॉनचा वेगान फैलाव होत आहे, त्यामुळे शिथिल झालेले निर्बंध पुन्हा कडक होत आहेत. ओमिक्रनला रोखण्यासाठी सरकार अलर्ट मोडवर आले आहे, अशातच वय वाढलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, त्यांना संधी मिळावी, याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत जाहिराती प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळे काही उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे काहींची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने आयोगामार्फत रविवार दिनांक 02 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021पुढे ढकलण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आले आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/tjqHxgbdkw
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 28, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- तुम्हाला ते जमलं नाही निदान नाच्याचं काम तरी नीट करा; भास्कर जाधवांचा राणेंवर पलटवार
- नारायण राणेंकडून भास्कर जाधवांना ‘नाचा’ची उपमा
- “आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?”
- कोण अजित पवार? मी नाही ओळखत; नारायण राणे आक्रमक
- आपण कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
