Share

“दिल्लीला पळून जाण्याचं बळ कोंबडीच्या पंखात नसतं”

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर कारवाईची प्रकिया सुरु आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या वकीलांनी राणेंच्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल आहे.

दरम्यान रविवारपासून नितेश राणे हे गायब आहेत. नितेश राणेंच्या गायब असण्यावरुन विरोधकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. ‘नितेश राणे हे अटकेच्या भितीने पळून गेले असावेत असा अंदाज विरोधकांकडून बांधला जात आहे. शिवसेनेने तर कणकवलीत आमदार राणेंना अटक करावी या मागणीसाठी सोमवारी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता.

नितेश राणे देखील गेले तीन दिवस कोठेच दिसत नसल्याने विरोधकांना त्यांच्यावर टीका करण्यासाठी आयती संधी चालून आहे. राष्ट्रवादीचे (NCP) पुणे शहरध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी नितेश राणेंचे नाव घेता एक ट्विट केले आहे. ‘लोकांना वाटत आहे ते दिल्लीला पळून गेले. कसे शक्य आहे? कोंबडीच्या पंखात एवढे बळ नसते, असं म्हणत प्रशांत जगताप यांनी नितेश राणेंना जोरदार टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!