मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात नेते मोदींना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. एवढंच नाही तर कंगना रणावत हिने देखील नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केले आरोप :
देशात झालेल्या नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने काळा पैसा जमा केला ज्याच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात भाजपचे कार्यालय उभारण्यात आले असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर या पैशांनी भाजपने अनेक राज्यांमध्ये सत्ता देखील स्थापन केली असून आमदारांना कोटीवदी रुपये देऊन फोडण्यात आलं, विकत घेण्यात आलं, याचं ताजं उदाहरण झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये देखील दिसून आलं, त्या ठिकाणी देखील दोन आमदारांना अटक केली असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
भाजपकडे इतका पैसा अचानक आला कुठून?
भाजपकडे इतका पैसा अचानक आला कुठून?, असा सवाल नाना पटोले यांनी करत भाजप तर चिवडा पार्टी होती, असा टोला देखील नाना पटोलेंनी लगावला आहे. त्यामुळेच नोटबंदीच्या माध्यमातूनच भाजपने काळा पैसा जमा केला असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नोटबंदीच्या माध्यमातून जमा केलेल्या काळ्या पैशातूनच जमिनी खरेदी करण्यात आल्या असून पक्षाची कार्यालय बांधण्यात आली आणि यानंतर देशात राजकारण पाहिला मिळालं असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- JIO VS AIRTEL | जिओ ने पुन्हा एअरटेल आणि VI ला टाकले मागे, एकाच महिन्यात जोडले इतके नवीन वापरकर्ते
- Amit Shaha | अमित शहांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा हलर्जीपणा शहांच्या गाडीसमोर TRS नेत्याने ताफ्या सोमर केली गाडी पार्क
- इलेक्ट्रॉनिक टॅटू म्हणजे काय? जे 2030 पर्यंत पुसून टाकेल पृथ्वीवरून स्मार्टफोनचे अस्तित्व..जाणून घ्या!
- Uddhav Thackeray | वेदांता प्रकल्पावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “आताचे सरकार…”
- Passport Update | 7 दिवसात मिळेल घरपोच पासपोर्ट..जाणून घ्या!


