🕒 1 min read
हैद्राबाद : तेलंगाणा मुक्ती दिन निमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी अमित शहा आज हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षे व्यवस्थेत पुन्हा एकदा हलगर्जीपणा करण्यात आल आहे. गणेश उत्सवावेळी देखील मुंबई दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत कमी पडली होती. मात्र, आज त्यांच्या ताफ्याच्या समोरच तेलंगाणा राष्ट्र समितीच्या एका नेत्यानं आपली कार पार्क केली. या घटनेमुळं मोठी खळबळ माजली.
अमित शहा यांच्या सुक्षेत निष्काळजीपणाः
शुक्रवारी रात्री उशीरा अमित शहा हैद्राबाद मध्ये पोहोचले. याचवेळी शाह यांच्या ताफ्याच्या पुढे टीआरएस नेता गोसुला श्रीनिवास यांनी अचानक आपली कार उभी केली. या प्रकारामुळं सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ माजली. पण त्यांनी तात्काळ सतर्क होत त्यांची कार तिथून हटवली.
टीआरसी नेत्याने शहांच्या ताफ्यासमोर केली गाडी पार्कः
श्रीनिवास यांनी त्यांच्या कारची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. मी कार चालवताना तणावाच्या स्थितीत होतो त्यामुळं अचानक माझी कार त्या ठिकाणी थांबली. पण कार हटवण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी माझ्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे, असं श्रीनिवासांनी सांगितलं आहे.
यापुर्वीही झाली होती चुकः
यापूर्वी मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शाह यांची सुरक्षा भेदून एक अनोळखी व्यक्ती शाहांच्या आजूबाजुला फिरत होता. मुंबई पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून हेमंत पवार या नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याजवळ गृहमंत्रालयाचं ओळखपत्र होतं. या आरोपीला कोर्टानं सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Passport Update | 7 दिवसात मिळेल घरपोच पासपोर्ट..जाणून घ्या!
- Ramdas Athvale | “वेदान्त-फॉक्सकॉन गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार”
- Kangana Ranaut | कंगना रणावतने नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
- Special Offer | ‘या’ प्रीमियम दर्जेदार साड्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Amezon वर उपलब्ध..जाणून घ्या!
- Ajit Pawar | “कित्येक दिवस तर ते दोघेच मंत्रीमंडळात होते…”; अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
