मुंबई : वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी अपयशाचे खापर आमच्यावर फोडत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आतापर्यंत या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.
गट प्रमुखांचा मेळावा आणि दसरा मेळावा संदर्भात आजची बैठक होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पावर भाष्य केले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना फोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. पण आधी त्यांनी शिवसेनेचा इतिहास जाणून घ्यावा, शिवसेनेच्या पिढ्यांचा अभ्यास करावा. शिवसेनेची सहावी पिढी आता मैदानात उतरली आहे. शिवसैनिक आता धगधगत्या मशालीसारखा मैदानात उतरला आहे.
वेदांता प्रकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले-
वेदांता प्रकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले, वेदांता फॉसस्कान प्रकल्प आणण्यासाठी आपल्या सरकारने खूप प्रयत्न केले. पण आताचे सरकार अपयशाचे खापर आपल्यावर फोडत आहे.
वेदांत आणि तैवानस्थित उत्पादन कंपनी फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाच्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे. कंपनी याआधी महाराष्ट्रात आपला सेमीकंडक्टर प्लांट उभारणार होती, पण कंपनीने आपल्या प्रकल्पासाठी गुजरातसोबत सामंजस्य करार केला.
महत्वाच्या बातम्या :
- Passport Update | 7 दिवसात मिळेल घरपोच पासपोर्ट..जाणून घ्या!
- Ramdas Athvale | “वेदान्त-फॉक्सकॉन गुजरातमध्ये जाण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार”
- Kangana Ranaut | कंगना रणावतने नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली…
- Special Offer | ‘या’ प्रीमियम दर्जेदार साड्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत Amezon वर उपलब्ध..जाणून घ्या!
- Ajit Pawar | “कित्येक दिवस तर ते दोघेच मंत्रीमंडळात होते…”; अजित पवारांचा विरोधकांवर हल्ला


