🕒 1 min read
मुंबई : मागील गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सकाळी ९ वाजता मागे घेतले असल्याची घोषणा केली. दीड वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर कशाचीच पर्वा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. तसेच कृषी कायदे मागे घेत मोदींनी देशाची माफीही मागितली आहे.
या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपले सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही, असं म्हणत त्यांनी देशाची क्षमा मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. मोदी यांनी केलेल्या या घोषणे नंतर विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
यावरच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांनी ट्विट करत अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला असे म्हंटले आहे. नाना पाटोले ट्विट करत म्हणाले, ‘पाच राज्यातील निवडणुकीवर डाेळा ठेऊन हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना व देशातील जनतेलाला मोदीजींनी सांगितले पाहीजे की परत असे कायदे देशात आणणार नाही, तसेच देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे.
शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं.
आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली.
हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय!#जीता_किसान_हारा_अभिमान— Nana Patole (@NANA_PATOLE) November 19, 2021
पाच राज्यातील निवडणुकीवर डाेळा ठेऊन हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना व देशातील जनतेला ला मोदी जी नी सांगितले पाहीजे की परत असे कायदे देशात आणणार नाही, तसेच देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे. pic.twitter.com/Q1399jT3dh
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 19, 2021
शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय! असल्याचं म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा
- शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘शेतकरी आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण?’
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
