🕒 1 min read
मुंबई : राज्यातील राजकारणात सध्या शिवसेनेच्या स्थितीवर मनसे कडून जोरदार टीका केली जात आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हात मिळवून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतरच्या काळात लवकरच मंत्रिमंडळाचा ही विस्तार केला जाईल असे सांगितले गेले होते. मात्र अजूनही राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना एकनाथ शिंदे सरकार मध्ये मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र राज ठाकरेंनी बोलताना या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
राज्यात एकनाथ शिंदे सरकार आल्यापासून शिवसेना आणि मनसे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मनसे कडून वारंवार शिवसेनेच्या झालेल्या या स्थितीवर खोचक टीका केली जात आहे. दरम्यान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी “अब राजा वही बनेगा जो हकदार होगा,”असे टि्वट देशपांडे यांनी केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबतचा राज ठाकरेंचा फोटो देशपांडेंनी शेअर केला आहे. त्यामुळे आता देशपांडे यांच्या या टीकेला शिवसेनेकडूनही पलटवार केला जात आहे.
शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, “राज ठाकरे यांनी स्वतःच्या मुलालाच का राजकारणात पुढे आणले, संदीप देशपांडे यांना का पुढे आणले नाही.” असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे.”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुढे नेत आहेत.” असेही मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
दरम्यान, अमित ठाकरे यांनी मंत्रिमंडळात सामील करायचे असेल तर गृहमंत्री पद मिळावे. अशी मागणी केली असल्याचे बातम्यांमध्ये समोर आले होते. त्यामुळे आता भाजप मनसे युती होणार की शिंदे गट मनसेत विलीन होणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विट मुळे ही चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे. राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन पुढे जातील. असेच संदीप देशपांडे यांच्या ट्विटमधून दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray : राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजिरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये; शिंदेंचा ठाकरेंना टोला
- Arjun Khotkar | मराठवाड्यातील शिवसेना खिळखिळी; अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील
- Eknath Khadse | या सरकारने संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय – एकनाथ खडसे
- Katrina Kaif | कतरिना कैफला जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
- IND vs WI : टीम इंडिया फुल जल्लोषात! वेस्टइंडीज विरुध्द विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची धमाल, पाहा VIDEO!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
