Share

“पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या, बुरसटलेल्या विचारांच्या नाना पटोलेंचे शुद्धीकरण करणे गरजेचे”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मोदींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातीलचं नाही तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. “मी मोदीला शिव्या देऊ शकतो, मारू शकतो”, अशा प्रकारचं वक्तव्यं नाना पटोले यांनी केलं होतं. यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर नाना पटोले यांनी मोदी नावाचा गावगुंड आहे त्याच्याबद्दल बोलत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आणि नाना पटोले यांनी वक्तव्य केलेला गावगुंड प्रत्यक्षात अवतरला. यावरुन आता भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार लाड यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुंबईत जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनाचा व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे. आ. प्रसाद लाड म्हणतात, ‘देशाच्या पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या व बुरसटलेल्या विचारांच्या नाना पटोले यांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. तरच त्यांचा हर्बल नशा उतरेल.’ अशी टीका आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी आता गावगुंड समोर आणला आहे. उमेश घरडे असे त्याचं नाव असून भंडारा पोलीस त्याची चौकशी करत आहेत. उमेश घरडे हा लाखणी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे. नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मीच तो गावगुंड आहे, असे म्हणत उमेश घरडे नावाच्या व्यक्तीने माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस समर्थित वकील सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला पत्रकारांसमोर आणले आहे. मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उमेश घरडेला चांगलाच घाम फुटला. त्याने अनेक प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. त्यामुळे नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड हाच आहे की केवळ हे एक थोतांड आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!