मुंबई : राज्य सरकार बरखास्त करा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. चंद्रकांत पाटील यांना नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कृषी वीजबिल वसुली आणि विजेचा उद्भवलेला प्रश्न यावरुन माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही नाना पटोलेंनी टीका केली आहे. आज ऊर्जा खात्याची परिस्थिती सर्वांसमोर आहे. हे खातं मागच्या सरकामुळे अंधारात गेलं. थकबाकी वसुल केली नाही तर हे खातं अंधारात जाईल. भाजप हा डबल गेम खेळत आहे. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नाना पटोले म्हणाले, लोक भाजपला हसतात. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठेवलं जातं. बाकी काही राहिलं नाही आता. आम्ही महात्मा गांधींच्या विचारांची लोकं आहोत. आमच्या मनात असे विचार येत नाहीत. त्यांच्याच मनात विचार येतात, असा टोलाही नाना पटोलेंनी भाजपला लगावला.
यावेळी वीज प्रश्नावरही पटोले यांनी भाष्य केलं. पटोले म्हणाले, आज ऊर्जा खात्याची परिस्थिती सर्वांसमोर आहे. हे खातं मागच्या सरकामुळे अंधारात गेलं. थकबाकी वसुल केली नाही तर हे खातं अंधारात जाईल. भाजप हा डबल गेम खेळत आहे. चालू बिल भरण्यास सांगितले होते. त्याला सुद्धा भाजपा विरोध करत आहे. त्यांचं भाजप राजकारण करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. अनपढ लोकांवर काय बोलायचं?, मी बावनकुळेंना ओळखत नाही, असा टोलाही त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना लगावला.
या देशाची ओळख पुसण्याच काम केंद्रसरकार करत आहे. रिझर्व्ह बँकेचा फंड गायब करून टाकला आहे. देशाची रिझर्व्ह बँक लुटली गेली आहे. मोठी लूट होत आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
“मविआ सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो”, भातखळकरांचे टीकास्त्र
राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले
“देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
पाल्यांना शाळेत पाठवणे जोखमीचे वाटत असेल तर पाठवू नये- आदित्य ठाकरे
“लवकरच मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसणार”, विरोधकांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर


