मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमची २५ वर्षे युती होती. मात्र भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणे म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने आम्ही गुलामांसारखे वागण्याची आस आमच्याकडून ठेवली. मात्र आम्ही झुकलो नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आम्ही भाजप सोडला पण हिंदुत्व सोडणार नाही. भाजप हे हिंदुत्व नाही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान कालच्या संवादात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधल्याचे दिसले. आता यावरूनच भाजप नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे की, शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुसरण करते का, ज्यांनी म्हटले होते की त्यांचा पक्ष राजकारणात आणि जीवनात कधीही काँग्रेसमध्ये सामील होणार नाही आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास ते पक्षाला टाळे ठोकण्यास प्राधान्य देतील.” असे राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी मी देखील गुन्हेगार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातील शिवसेनेची कामगिरी यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. तसेच ज्यांना गद्दारी करायची आहे त्यांनी शिवसेना खुशाल सोडावी, असंही त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत”
- IND vs SA : विराटचं राष्ट्रगीतादरम्यान लज्जास्पद कृत्य!; चाहतेही भडकले
- गेल्या २४ तासांत देशातील ३ लाख ६ हजार नागरिक कोरोना पॉझिटीव्ह
- “देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
- राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले

