Share

तर देशात शिवसेनेचा पंतप्रधान असता – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काल(२३ जाने.)९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत ठाकरेंच्या वक्तव्यांचे समर्थन केले आहे.

यावेळी बोलत असतांना संजय राऊत म्हणाले की,’भाजपला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमीनीवरुन आकाशापर्यंत पोहचवले आहे. आम्ही युतीचा धर्म कायम पाळला असून इतिहास याला साक्ष आहे.’ तसेच ही केवळ शिवसेनेची गोष्ट नसून जे चांगल्या हेतूने भाजपसोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागलीय, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’बाबरीनंतर शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. त्यावेळी आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब अगदी जम्मू काश्मीरपर्यंत निवडणूक लढलो असतो तर काल जसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे देशात आमचा पंतप्रधान असता. परंतु आम्ही हे सारं भाजपासाठी सोडलं,’ असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!