मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वेगवेगळे वक्तव्य केले आहेत. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
याबाबत आमदार अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्यास केवळ शेजारच्या मुलांचे विलगीकरण करावे, असे शिक्षण खाते म्हणते तर करोनाबाधित आढळल्यास संपूर्ण वर्ग बंद करावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात. हे राज्य नेमके कोणते मुख्यमंत्री चालवतात?’, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्यास केवळ शेजारच्या मुलांचे विलगीकरण करावे, असे शिक्षण खाते म्हणते तर करोनाबाधित आढळल्यास संपूर्ण वर्ग बंद करावा असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात.
हे राज्य नेमके कोणते मुख्यमंत्री चालवतात? pic.twitter.com/28Ph2LPmvx— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 24, 2022
राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या गेल्या आहेत. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. असे वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
“मविआ सरकारच्या राज्यात प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो”, भातखळकरांचे टीकास्त्र
राज्य सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्रातील सरकार बरखास्त करा-नाना पटोले
“देशात एकच मोदी नाहीत, निरव मोदी, ललित मोदीही आहेत, ‘त्या’ घटनेवरून नाना पटोले संतापले
पाल्यांना शाळेत पाठवणे जोखमीचे वाटत असेल तर पाठवू नये- आदित्य ठाकरे
“लवकरच मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये दिसणार”, विरोधकांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर


