Share

“भाजपने ज्या ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली त्याला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला”, नवाब मलिकांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमची २५ वर्षे युतीत सडली. मात्र भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणे म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने आमच्याकडून गुलामांसारखे वागण्याची आस ठेवली. मात्र आम्ही झुकलो नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आम्ही भाजप सोडला पण हिंदुत्व सोडणार नाही. भाजप हे हिंदुत्व नाही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आता उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याचे नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही समर्थान केले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले की शिवसेनेची गेली २५ वर्ष भाजपसोबत युती होती. २५ वर्ष युतीमध्ये सडली. ही सत्य परिस्थिती आहे. भाजपने ज्या ज्या पक्षासोबत हातमिळवणी केली त्याला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या करणामुळेच शिवसेनेने २०१९ च्या निवडणुकीनंतर निर्णय घेतला” असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान कालच्या संवादात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधल्याचे दिसले. आता यावरूनच भाजप नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे की, शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुसरण करते का, ज्यांनी म्हटले होते की त्यांचा पक्ष राजकारणात आणि जीवनात कधीही काँग्रेसमध्ये सामील होणार नाही आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास ते पक्षाला टाळे ठोकण्यास प्राधान्य देतील.” असे राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!