मुंबई: सध्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी देखील जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मिशन विदर्भा करताना दिसत आहेत. अशातच आता कॉंग्रेस पक्षाचे परदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे निवडणुका बिनविरोध होण्यासाठी कॉंग्रेस पुढाकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी कॉंग्रेस पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. याचाच भाग म्हणजे कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे याची कुठलीही माहिती अद्याप मिळाली नाहीये.
यापूर्वीदेखील नाना पटोले यांनी राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळी फडणवीस यांची भेट घेतली होती. . काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर काँग्रेसतर्फे रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. याच जागेसाठी निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी फडणवीसांकडे केली होती.
महत्वाच्या बातम्या:
- ‘ये कप्तान है टॉस भी जितेगा मॅच भी’, ट्विटरवर रोहितचा ट्रेंड
- ‘अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारची भूमिका संशयास्पद
- ‘शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा’
- रोहित-राहुलच्या ‘पदार्पणात’ टीम इंडियाचा मोठा विक्रम; T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही टाकले मागे
- ‘तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांवर अॅक्शन घ्याल त्याला रिअॅक्शन मिळाल्यास आम्हाला दोष देऊ नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

