Share

‘तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांवर अॅक्शन घ्याल त्याला रिअॅक्शन मिळाल्यास आम्हाला दोष देऊ नका’

Published On: 

मुंबई : राज्यभरातील एसटी कर्मचारी एसटीच्या राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. संप अद्यापही मिटायचे चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जात आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

याबाबत प्रविण दरेकरांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. प्रविण दरेकर म्हणाले, अॅक्शनला रिअॅक्शन हा निसर्गाचा नियम आहे. त्रिपुराच्या घटनेने अॅक्शन झाली त्याला अमरावतीत रिअॅक्शन मिळाली. तुम्ही जबरदस्तीने जर कधी कर्मचाऱ्यांना डेपोत नेत असाल तर मग या अॅक्शनला रिअॅक्शन मिळाली आणि कर्मचाऱ्यांचा संयमाचा बांध तुटला तर आम्हाला दोष देऊ नका. असा इशराच प्रविण दरेकरांनी राज्य सरकारला दिला आहे.

संपामध्ये सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी रत्नागिरी विभागातील एकूण ८६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर १४३ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. २४ तासात कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत रत्नागिरी विभागातील एकूण ८६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केलेले आहे. त्यामध्ये गेल्या आठवडय़ातील २७ तर आता नव्याने ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांमध्ये आता संतापाची भावना निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीने अनेक कर्मचारी कामावर हजर होत आहेत. काल रत्नागिरी विभागातील १४३ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल थांबवा असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!