जयपूर : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. सूर्यकुमार यादवने ४० चेंडूंत ६२ धावा आणि कर्णधार रोहित शर्माने (३६ चेंडूंत ४८ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर आघाडी मिळविली.
तसेच रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या कर्णधार-प्रशिक्षकाच्या नव्या पर्वाचाही विजयी प्रारंभ झाला. भारताच्या या विजयानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच आधी टॉस आणि नंतर सामना जिंकल्यानंतर ट्विटरवर रोहितचे कौतुक करत मिम्स देखील शेअर करण्यात आल्या आहे.
Rohit Sharma wins the toss. Indian fans: #INDvNZ pic.twitter.com/iziqWeW22G
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 17, 2021
Rohit Sharma is the best T20. Captain in the world rn. Agree or agree!! @ImRo45 #CaptainRohitEraBegins pic.twitter.com/RGOWfwqHiy
— RaNa???? (@Freak4Hitman) November 16, 2021
Rohit Sharma be like pic.twitter.com/bxl5qrAcL2
— Robert Taxiwala (@OTP_Batao) November 17, 2021
https://twitter.com/gujju_105/status/1460959295764197382?s=20
https://twitter.com/Nishidhoni/status/1461019157227474944?s=20
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या न्यूझीलंडने दिलेले १६५ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठत तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित आणि के. एल. राहुल (१५) यांनी पाच षटकांतच भारताचे अर्धशतक केले. मिचेल सँटनरने राहुलला बाद करत भारताला पहिला झटका दिला. रोहितला मग सूर्यकुमारची उत्तम साथ लाभली. त्यांनी ५९ धावांची भागीदारी रचल्यावर ट्रेंट बोल्टने रोहितला माघारी पाठवले. सूर्यकुमारच्या ६२ धावांच्या खेळीत सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर ऋषभ पंतने नाबाद १७ महत्वाचे योगदान देत भारताला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या:
- ‘न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजाला माझी कमजोरी माहीत आहे’; रोहित शर्माचा खुलासा
- ‘अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारची भूमिका संशयास्पद
- ‘शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा’
- रोहित-राहुलच्या ‘पदार्पणात’ टीम इंडियाचा मोठा विक्रम; T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही टाकले मागे
- ‘तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांवर अॅक्शन घ्याल त्याला रिअॅक्शन मिळाल्यास आम्हाला दोष देऊ नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

