Share

‘शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा’

Published On: 

मुंबई : राज्यात शिवसेना- भाजपची युती तुटली आणि संपूर्ण राज्याच्या राजकारणीची समीकरणंच बदलली. शिवसेना आणि भाजपमध्ये 50-50 फॉर्मुल्यावरुन मोठा वाद झाला. त्यानंतर मुख्यमत्रिपदावरुन झालेल्या सेना-भाजपच्या या वादाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला आणि शिवसेनेसोबत हातमिळवणी करुन सत्तेत आले. शिवसेना-भाजप आणि इतर मित्रपक्षांनी पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन करण्याबाबत आता पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद किती वर्षे द्यावं याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्रिपद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, रामदास आठवले यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवेसना आणि भाजप यांच्यात वाटून घ्यावं, असं मत मांडलं होता. मात्र आता ते 5 वर्षे मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास तयार झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलतील का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!