Share

रोहित-राहुलच्या ‘पदार्पणात’ टीम इंडियाचा मोठा विक्रम; T20 विश्वचषक चॅम्पियन ऑस्ट्रेलियालाही टाकले मागे 

Published On: 

जयपूर : भारतीय संघाने T20 विश्वचषक 2021 मधील पराभव मागे टाकून पुढील वर्षीच्या स्पर्धेची तयारी सुरू केली आहे आणि त्याची सुरुवात यंदाच्या उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने झाली आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या किवी संघासोबतच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 5 गडी राखून विजय मिळवला. नवा कर्णधार रोहित शर्मा आणि नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जयपूरमधील या सामन्यात 165 धावांचे लक्ष्य गाठले आणि त्यासोबत एक विक्रमही केला.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी जयपूरमध्ये मिळालेला विजय हा लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना टीम इंडियाचा ५० वा विजय होता. भारतीय संघाने 151 सामन्यांमध्ये हा 50 वा विजय मिळवला. टीम इंडियाने एकूण 96 सामने जिंकले आहेत.

आतापर्यंत भारतीय संघ या बाबतीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने होता, मात्र आता त्यांना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाने 49 वेळा दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 153 सामन्यांमध्ये यश मिळवले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने 183 सामन्यांत केवळ 49 वेळा लक्ष्य यशस्वीपणे गाठले आहे.

या तीन संघांशिवाय इंग्लंडचाही या यादीत समावेश आहे, पण तो त्यांच्यापेक्षा थोडा मागे आहे. इंग्लंडने आतापर्यंत 143 सामने खेळले असून त्यापैकी 42 वेळा दुसऱ्या डावात फलंदाजी करत लक्ष्य गाठण्यात इंग्लंडला यश आले आहे. बुधवारी टीम इंडियाच्या विजयात रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांनी आपल्या सुरेख गोलंदाजीचे दर्शन घडवत न्यूझीलंडला 164 धावांवर रोखले.

त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीला चांगली सुरुवात करून दिली, ती सूर्यकुमार यादवच्या उत्कृष्ट अर्धशतकाने लक्ष्याच्या जवळ पोहोचली. सरतेशेवटी, एका रोमांचक सामन्यात ऋषभ पंतने 20 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून सामना संपवला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!