Share

Nana Patole | आमचं आरक्षण हिसकावून घेतलं तर खबरदार तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवर भाष्य केले. “ओबीसींनी आरक्षण मागण्याचा प्रश्नच येत नाही कारण ते आम्हाला आधीच मिळालेलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी संविधानात तशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे हा आमचा अधिकार आहे. जे आमचं आहे ते आमचंच आहे. पण आमचं ओबीसी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केलात तर खबरदार! तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करण्याची जी कूटनीती देशात चालू आहे, तिचा विरोध होणे आवश्यक आहे.”, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

पुढे ते असंही म्हणाले कि, “मतांचा मलिदा मिळवण्यासाठी ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात आहे.” तसेच त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. “या सरकारने पूर्ण देशात पुरोगामी महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत. शेतकरी आत्महत्या देखील सुरू आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. सरकार आणि प्रशासन दोन्ही ठप्प झालं आहे, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात कधीही निर्माण झाली नव्हती.”, या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!