टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून कॉंग्रेसने पोलखोल यात्रेचे आयोजन केले आहे.
ही यात्रा चंद्रपूर येथे आली असता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. राज्यातील फडणवीस सरकारने पाच वर्षात काय केले, याचा जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गावात आलो आहे असं सांगत राज्यातील भाजप सरकार खोटारडे असल्याचं नाना पटोले यांनी म्हटले आहे. शेतकरी, युवक, गोरगरीब, छोटे व्यापारी यांची फसवणूक केली आहे असा आरोपही पटोले यांनी सरकारवर केला आहे.
तसेच पुढे बोलताना पटोले यांनी शेतक-यांची साधी कर्जमाफी सुद्धा करता आली नाही. २०१६ मध्ये दिलेले कर्जमाफीचे आश्वासन हवेत विरल्याचे ते म्हणाले. विदर्भानं आजवर अनेक मुख्यमंत्री दिले. आजही त्यांचं नाव गौरवानं घेतलं जातं. मात्र फडणवीस यांनी हा गौरव धुळीस मिळवला आहे अशी घणाघाती टीका फडणवीस यांच्यावर केली आहे.
दरम्यान यापूर्वीही पटोले यांनी मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला ५० कोटी रुपये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीत टेंडर न काढता कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. ५ वर्षात ओबीसींची शिष्यवृत्ती थांबवली. तर हे सरकार sc, st, obc विरोधी असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता.
- वाचा का मानले सुनील तटकरेंनी सरकारचे आभार
- ‘पी.चिदंबरम यांना अटक झाली, हे ऐकून मला फार आनंद झाला’
- पाच वर्षात फडणवीस सरकारने अधोगतीचा इतिहास रचला – जयंत पाटील
- यापुढे कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही, राष्ट्रवादीच्या आमदाराची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

