टीम महाराष्ट्र देशा: गेली ५ वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन काही लोक सत्तेत आले. पण महाराष्ट्रातल्या जनतेला त्यातलं काहीच मिळालं नाही. अधोगतीचा नवा इतिहास फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षांत रचला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेला आज जुन्नर येथून सुरुवात झाली, यावेळी आयोजित सभेत पाटील बोलत होते.
सत्तेवर येताना भाजपने दरवर्षी २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पाच वर्षात १०% रोजगार जरी महाराष्ट्रात आले असते तरी १ कोटी तरुणांना रोजगार मिळाला असता. राज्याच्या डोक्यावरील कर्ज पाच लाख कोटींवर जाऊन देखील महाराष्ट्रात विकास कुठेच दिसत नाही. कोणत्याही जिल्ह्यात नवी गुंतवणूक अथवा रोजगार मिळाला का? असं विचारलं तर नकारात्मक उत्तरचं मिळते, असा घणाघातही जयंत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व घटकांवर कसा अन्याय झाला, त्याचबरोबर उद्याच्या पाच वर्षाचा महाराष्ट्र आम्ही कसा घडवणार, हे जनतेला सांगण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आल्याचं यावेळी पाटील म्हणाले.
शिवनेरीवर महाराजांचे आशीर्वाद घेऊन शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात
एका बाजूला भाजपा आणि शिवसेनाने जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे.राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी नतमस्तक होऊन शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला आहे. या यात्रेनिमित्त अमोल कोल्हे संपूर्ण राज्यात फिरणार आहेत.
खासदार अमोल कोल्हे यांची लोकप्रियता पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर शिवस्वराज्य यात्रेची जबाबदारी सोपवली आहे. या यात्रेद्वारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला पुन्हा बळ आणण्यासाठी अमोल कोल्हे प्रयत्न करणार आहेत. सामान्य नागरिकांमध्ये खासकरून तरुणांमध्ये अमोल कोल्हे चांगलेच प्रसिद्ध आहेत. कोल्हे यांच्या या यात्रेचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला फायदा होणार का हे पहाव लागणार आहे.
ठरलं तर मग…मनसेचे उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार
आघाडीवरुन जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांना अप्रत्यक्ष टोला
भाजप-आणि शिवसेना आमच्या नेत्यांच्या मागे लागले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

