Share

वाचा का मानले सुनील तटकरेंनी सरकारचे आभार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:-आंबेनळी घाटात एक वर्षांपूर्वी झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील ३० कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते.यापैकी २७ जनांच्या कायदेशीर वारसांना कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय दिनाक २० रोजी घेण्यात आला आहे.

सरकारने १९ जणांना गट क आणि ड संवर्गात नियुक्तीचा शासन आदेश निर्गमित केला असून त्याची प्रत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत यांना कृषिमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली आहे. त्याबदल सुनील तटकरे यांनी सरकारने जो निर्णय घेतला आहे त्या बदल समाधान वाटत आहे असे एक पत्र लिहवून त्यांनी सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात कोकण विद्यापीठातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व जणांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कृषी, वित्त, सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करून गट क व ड मधील १९ कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीचा शासन आदेश आज काढण्यात आला. कृषी विद्यापीठाची बैठक आज मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी या आदेशाची प्रत कोकण विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आली.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे खा. सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले होते. सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोलल जात होते . परंतु सुनील तटकरे यांनी मात्र सर्व वृत्तांच पूर्ण पणे खडनं केले होते . पण त्यांतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारचे आभार मानल्याने ते पक्ष बदलणार का याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!