Share

‘पी.चिदंबरम यांना अटक झाली, हे ऐकून मला फार आनंद झाला’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना सीबीआय कोठडी सुनावली आहे. पी. चिदंबरम यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची वार्ता ऐकून आनंद वाटला असल्याची प्रतिक्रया इंद्राणी मुखर्जीने दिली आहे. गुरुवारी यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता मुखर्जी यांनी चिदंबरम यांच्या अटकेवर आनंद व्यक्त केला आहे. चिदंबरम यांना झालेली अटक ही एक चांगली बातमी आहे, असे त्या म्हणाल्या.

आयएनएक्स मीडियाचे प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि तिचे पती पीटर मुखर्जीयांच्या दिलेल्या जबाबावरच ईडी आणि सीबीआयने चिदंबरम यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांच्या अटकेची वार्ता ऐकून आनंद झाला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तर आयएनएक्स मीडियाच्या प्रमोटर खुद्द इंद्राणी मुखर्जी सध्या मुलगी शीना बोराच्या हत्येप्रकरणी तुरूंगवासी आहेत.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. तर सीबीआयला अजून चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली उच्च न्यायालयने रद्द केलेल्या जामीन विरोधात चिदंबरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयाने मात्र त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे.दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन नाकारला ते योग्यच केले आहे. चिदंबरम आधीच CBI च्या कोठडीत आहेत. त्यामुळे चिदंबरम यांच्या या याचिकेला काही अर्थ नाही’, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!