मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते.
दरम्यान,याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. काँग्रेसने मात्र राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे. तर शरद पवार शिवसेनेत की राष्ट्रवादीत आहेत हे तपासण्याची गरज आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहे हे आम्हाला माहिती आहे. शिवसेनेचे प्रवक्ते, सामना पेपरचे संपादक आहेत हे आम्हाला माहित आहे. परंतु अलीकडच्या काळात आम्हाला त्यांचे नवे रूप पाहायला मिळत आहे. ते म्हणजे राष्ट्रवादी प्रवक्ते किंवा शरद पवारांचे प्रवक्त्यासारखे ते वागत आहेत त्यामुळे हे योग्य नाही. जे या युपीएचा हिस्साच नाही त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये, असा टोला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत या संदर्भात बोलणार आहे. जर आमच्या नेत्यांवर टीका करायची असेल तर मग आम्हालाही विचार करावा लागणार हे आम्ही निश्चितपणे त्यांना ठणकावून सांगणार आहे. आमच्यामुळे सरकार आहे आम्ही सरकार नाही हे पहिल्या दिवशी सांगितलं आहे. ज्या पवार साहेबांची येथे वकिली करत आहेत ती वकिली त्यांनी थांबवावी, असा सल्ला पटोले यांनी राऊतांना दिला आहे .
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे सामना आमच्या हातातून निसटला : विराट कोहली
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- …म्हणून पांड्याला बॉलिंग नाकारली कोहलीने सांगितले कारण
- ‘आणखी किती फेकाल मोदी जी, मराठीत एक लाईन आहे… हद झाली राव’
- अवैध दारू विक्री निदर्शनास आणून द्या, एक वर्ष करापासून मुक्ती मिळावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
