Share

‘या’ कारणामुळे सामना आमच्या हातातून निसटला : विराट कोहली

Published On: 

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयासोबतच इंग्लंडच्या संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. भारताच्या पराभवामुळे मालिकेचा अंतिम सामना हा निर्णायक ठरणार आहे. अखेरच्या सामन्यात जो संघ विजयी ठरेल त्याच्या खिशात मालिका जाईल.

दुसऱ्या सामन्यानंतर कर्णधार कोहलीने भारतीय संघाच्या पराभवाची कारणे स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना कोहली म्हणाला की, पहिल्या डावात आम्ही चांगली फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली होती. त्यांनतर दुसऱ्या डावात नवीन चेंडुने आम्ही सुरुवात देखील चांगली केली. मात्र इंग्लंडच्या फलंदाजानी पहिल्या दोन गड्यासाठी केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारताचा पराभव झाला. शतकी भागीदारीमुळे भारताच्या हातुन सामना निसटला.

इंग्लंडच्या फलंदाजानी चांगली फलंदाजी केली त्यामुळे विजयाचे श्रेय त्यांना मिळाले पाहिजे. मैदानात दवांचे प्रमाण नव्हते मात्र खेळपट्टी फलंदाजीला साथ देणारी होती. मागील सामन्यात आम्ही सरस खेळ केला आणि आमचा विजय झाला या सामन्यात इंग्लंडने चांगला खेळ केला आणि त्यांचा विजय झाला. शतकाविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना कोहली म्हणाला की मी शतकासाठी नाही तर विजयासाठी खेळतो.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!