लातूर : गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचे काम सध्या सुरु आहे. अशीच एक योजना टाका गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने एक आगळा वेगळा ठराव संमत केला असून यानुसार अवैध दारूविक्री निर्देशनास आणून देणाऱ्यास एक वर्षाचा ग्रा.पं. चा कर माफ, तर अवैध दारूविक्रेत्यास व ज्या हॉटेल मध्ये दारु पिलेले आढळून येईल त्या हॉटेल चालकाकडून पाच हजाराचा दंड वसूल केला जाणार आहे.
गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून यामुळे गावातील सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडत असल्याचे सांगितले जात आहे या दारुचा महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ग्रामपंचायतीला निदर्शनास आणून दिल्या गेले. यावर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी याबाबत चर्चा करून दारुबंदीचा एकमुखी ठराव संमत केला. यानुसार गावात कोणी अवैध दारूविक्री करीत असेल तर दारु विक्रेता ग्रामपंचायतीला निदर्शनास आणून देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचा एक वर्षाचा ग्रा.पं. कर माफ केला जाणार आहे.
तर अवैध दारूविक्री करणाऱ्यांकडून पाच हजाराचा दंड वसूल केला जाणार आहे. याच बरोबर जो हॉटेल चालक आपल्या हॉटेल मध्ये तळीरामास दारू पिण्यासाठी आश्रय देईल त्यालाही पाच हजाराचा दंड केला जाईल असा ठराव संमत करण्यात आला आहे.यामुळे अवैध दारू विक्रीला चपकार बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’


