नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मोदींच्या या दौऱ्याचा कारण देखील खास आहे. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते,’ असे उद्गार यावेळी मोदींनी काढले आहेत.
और कितना फेकोंगे मोदी जी…..
हमारे मराठी मे एक लाईन है…. हद झाली राव..किसान आंदोलन कर कर एक शब्द तक आपके मुह से निकला नही…. और आझादी की बात करने बांग्लादेश जाते हो…… किसानो को आंदोलनजीवी आपने कहा था…. आप कोण हुए अब ढोंगीजीवी. https://t.co/H8g3AQk47C
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 26, 2021
मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर मोदींना अजून किती फेकणार असा टोला लगावला आहे. नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर एक शब्दही तुमच्या तोंडून निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी’. असा घणाघात पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज 1.54 कोटीहून जास्त मतदार बजावणार आपला हक्क
- अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक ; आकाशाकडे पाहून म्हंटला…
- लातूर जिल्ह्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने; हॉटेल, बार, पान टपऱ्या, चहा कॅन्टिन बंद!
- भारताचा पराभव, इंग्लंडची वन डे मालिकेत 1-1 अशी बरोबरी
- ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अत्याचारग्रस्त महिलांचा टाहो ऐकायला जात नाही’

