मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या पॅकेजवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. आमची अपेक्षा अशी होती की लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध सरकार लावणार असेल तर विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे. मात्र ठाकरे सरकारने जाहीर केलेलं 5 हजार 300 कोटींचं पॅकेज निव्वळ धूळफेक आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली आहे.
फडणवीसांच्या या टीकेला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन नाही हे मला माहिती आहे. कारण त्यांच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण त्यांचं जर वजन असेल, तर त्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याचे केंद्रात अडकलेले ९० हजार कोटी रुपये मिळवून द्यावेत आणि या मुद्द्यावर राजकारण करू नये’, असं नाना पटोले यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.
‘आम्हाला वेगळा निधी द्यायची गरज नाही. आमचेच पैसे त्यांनी द्यावेत. तर राज्य सरकार सगळ्यांना मदत करेल. राज्य सरकारकडून ते करून घ्यायची जबाबदारी काँग्रेसची असेल. पण यात त्यांनी राजकारण करू नये. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचं आम्ही समर्थन करतो आणि पॅकेजसाठी अभिनंदन करतो. पण त्यात काही घटक सुटलेले आहेत. न्हावी, फुल विक्रेते, शेतकरी यांचा त्यात समावेश करावा ही मागणी करणारं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांना काँग्रेसकडून दिलं जाणार आहे’, असं देखील नाना पटोल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकारी इन अॅक्शन मोड, ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी खासगी प्लॅन्ट केला अधिग्रहीत
- व्यापाऱ्यांचा लॉकडाऊन कडाडून विरोध, पुण्यातील व्यापारी ठोठावणार कोर्टाचा दरवाजा
- लातूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनीसाठी ८० लाख मंजूर
- मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र, हे सरकारला माहितच नाही-फडणवीस
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हदरम्यान मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या विनोदी प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

