लातूर: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या मृत्यूत वाढ झाली. त्यामुळे उदगीर शहरातील अशोक नगर येथील सार्वजनिक स्माशानभूमीमध्ये अद्ययावत गॅस शवदाहिनी बसवण्यात येणार आहे. या कामासाठीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही पर्यावरण पूरक अशी शवदाहिनी असुन कोरोना काळात अत्यंत उपयोगी ठरणार असल्याची माहिती उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर शहराचा झपाट्याने विकास होत आहे. या विकासात काही रस्ते विकास, नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम अशी विकास कामे शहरात सुरू आहेत. यासोबतच काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पारंपारिक शवदाहिनी मुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान या आधुनिक अद्यावत अशा शवदाहिनी मुळे टाळता येणार आहे. जिल्हा नियोजन समितीने यासाठी ८० लाखांचा निधी उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रातील पुणे , मुंबईसारख्या मोठ्या शहरात याचा वापर करण्यात येतो. आता उदगीर शहराची याची सुरुवात होणार आहे.
कोरोनाच्या महामारी आधुनिक शवदाहिनीची गरज होती. अशोकनगर मधील अद्यावत अशी शवदाहिनी मुळे ही गरज पूर्ण होणार आहे. याबाबत लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल व ही तात्काळ कार्यान्वित करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादकही चिंतेत
- ‘हारी हुई बाजी जितना हमे आती है’ हिटमॅन रोहित शर्माची विजयानंतर प्रतिक्रिया
- धक्कादायक! कोरोनाच्या संकटात महिला तस्करी, बालविवाह वाढले
- कोरोनामुळे सलग दुसर्या वर्षी पाडव्याला परभणीमध्ये सराफा खरेदी – विक्री ठप्प
- ‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त तज्ज्ञांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

