औरंगाबाद : जिल्ह्यातील रुग्णालयाच्या , वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकते नुसार प्रथम प्राधान्य देऊन पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खासगी कंपनीला तत्काळ ऑक्सिजन पुरवठा पुढील आदेशापर्यंत करावा असे अधिग्रहित करण्यात आले. असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी आदेश दिले आहेत.
अधिग्रहित केलेला उत्पादक ऑक्सीजन प्लांट स्थळावरून शहरातील अथवा जिल्हयातील कोणत्याही हॉस्पिटल, वितरक यांना विनाविलंब ऑक्सिजन पुरवठा करतील.या कामात कुठलाही निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष होणार नाही, याची दखल घ्यावी. या पथकातील सनियंत्रण अधिकारी प्रादेशिक पर्यटन महामंडळाचे उपसंचालक श्रीमंत हारकर (संपर्क 7588649230) व सहआयुक्त औषधे अन्न व औषध प्रशासन,औरंगाबाद (संपर्क 9987236658, 9423738922) यांच्याशी समन्वय ठेवून वेळोवेळी अहवाल सादर करावे लागणार आहे.
कोविड बाधित रुग्णांस व अशा रुग्णांवर उपचार करणारे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (DCH) व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर (DCHC) यांना मोठ्याप्रमाणावर ऑक्सीजन लागत आहे.
मार्च महिन्यात कोराना रुग्णांची वाढत गेलेले रुग्ण तसेच त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता भविष्यात जिल्हयात तसेच औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजनचा (जम्बो सिलेंडरच्या स्वरुपात) आकस्मिक आवश्यकते प्रमाणे तत्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. कोविड – 19 पहिल्या लाटेच्या वेळी तसेच मार्च 2021 मध्ये काही वेळा पुरवठयापेक्षा ऑक्सिजनची मागणी खुपच वाढल्यामुळे निकडीची परिस्थिती आली होती. जिल्हयामध्ये ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर असणाऱ्या बेडची संख्या देखील वाढल्यामुळे ऑक्सिजनचा तत्काळ लागणारा साठा चोविस तास उपलब्ध असणे खुप आवश्यक आहे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी हे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार औद्योगिक कारणासाठी उत्पादित करणाऱ्या ऑक्सिजनच्या वापराबाबत फार्मासिटीकल कंपनी, व्हॅक्सीन निर्माण करणाऱ्या कंपन्या, महत्वाचे आणि अतिमहत्वाचे मेडिकल सामुग्री याव्यतिरिक्त उर्वरित सर्व साठा वैद्यकीय वापरास्तव उपयोगात आणण्यासाठी आदेश दिले गेले आहेत. यामध्ये निष्काळजीपणा, दुर्लक्ष झाल्यास आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणार आहे. ऑक्सिजन उत्पादकांनी जम्बो सिलेंडर वेळोवेळी जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार तसेच जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाच्या, वितरकांच्या ऑक्सिजनच्या आवश्यकतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तत्काळ पुरवठा करावा, यासाठी पथकाची नेमणूक केली. असल्याचेही आदेशात उल्लेश केला असल्याचे या आदेशामध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार


