चेन्नई : मगंळवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएलच्या अंत्यत चुरशीच्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने विजयाची गुढी उभारत कोलकाता नाइट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला आहे. या विजयासोबत मुंबईने या मोसमातील आपल्या पहिल्याच विजयाची नोंद केली आहे. तसेच कोलकाताविरुद्ध विजयाची पंरपरा कायम ठेवली आहे.

सामन्यातील पहिल्या डावात मुंबईची फलंदाजी सुरु आसताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. त्यामुळे क्रिकेटप्रेमी मध्ये संभ्रम सुरु होता सामना बघायचा का मुख्यंमत्री ठाकरे यांना बघायचे. ठाकरे यांच्या लाइव्ह दरम्यान मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी विनोदी कमेंट केल्या. मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने ‘मुंबई इंडियन्सची फलंदाजी चालू आहे. थेट मुद्द्यावर या,’ अशी कमेंट केली.
https://www.instagram.com/p/CNnMqzolghk/
तर काही चाहत्यांनी कमेंट मध्ये सामन्याचे धावते समलोचन कमेंट मध्ये करायला सुरुवात केली. काही चाहते म्हणाले की, तुम्ही चालु द्या मी इथे स्कोर सांगत राहणार आहे काळजी नसावी. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने या कमेंटचा एक स्किनशॉट सोशल मीडीयावर शेअर केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या १५३ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाला २० षटकांत ७ बाद केवळ १४२ धावाच करता आल्या.
महत्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथ अडकले कोरोनाच्या विळख्यात…
- ‘पोलिसांची बांधिलकी जनतेशी असावी ना की सत्ताधाऱ्यांशी,’ मेहबूब शेख प्रकरणावरून चित्रा वाघ कडाडल्या
- धक्कादायक! मोबाईलवर गेम दाखवण्याच्या आमिषाने दोन बालकांवर अत्याचार
- केकेआरच्या पराभवानंतर शाहरुखने व्यक्त नाराजी; चाहत्यांची मागीतली माफी
- देशात लागणार संपूर्ण लॉकडाऊन ?, निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

