Share

‘आरएसएस’च्या लोकांना फडणवीसांच्या कार्यकाळात किती टक्केवारी दिली ? नाना पटोलेंची टीका

Published On: 

मुंबई : केंद्राकडून IPS अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांचा वापर केला जात आहे. या माध्यमातून राज्य सरकारवर खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर अशाच प्रकारचे आरोप झाले होते. पण देवेंद्र फडणवीस तेव्हा न्यायाधीशाच्या भूमिकेत गेले होते. त्यांनी सर्वांना क्लिनचीट दिली होती, असं पटोले म्हणाले. ते मुंबई झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘RSSच्या लोकांना फडणवीस यांच्या कार्यकाळात मंत्रालयात अनेक महत्त्वाची पदं दिली होती. त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, त्यांना किती टक्केवारी दिली, याची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत,’ असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. नाना पटोले यांनी मात्र आपण बदली नाही तर निलंबन केलं असतं असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!