Share

Nana Patole | “ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी 24 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते फडणवीसांवर निशाणा साधत आहेत. अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले नाना पटोले ?

शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का?, असा सवाल करत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे.

तसेच, महाराष्ट्रातील उद्योगधंदे व गुंतवणूक गुजरातमध्ये पाठवली जात आहे. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातमध्ये जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे पाठवायचे याचा अभ्यास करायला ते गेले होते काय ?, असा खोचक सवालही पटोले यांनी विरोधकांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!