Share

MNS | मनसे नेत्याने केली पंकजा मुंडेंची पाठराखण! म्हणाले, “भाजप सरकार सत्तेत आल्यापासून…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या अनेक दिवसापासून भाजप मध्ये असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या बातम्या वारंवार माध्यमांतून समोर येत असतात. एवढंच नाही तर पंकजा मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं असून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी पंकजा मुंडे यांनी पाठराखण केली आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया :

यादरम्यान, गेली अडीच वर्षे पंकजा मुंडेंवर टीकाटीप्पणी केली जात नव्हती, मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून पंकजा मुंडेंवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. भगवानगडावर घेण्यात येत असलेल्या दसरा मेळाव्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी एका पक्षाच्या राज्य कार्यकारणी स्तरावरील लोकांना फूस लावली जात असल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे.

पंकजा मुंडेंना महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा कार्यक्रम काही लोक चालवत आहेत, पण, काही लोकांना हेच समजत नसून आपल्या एका सहकाऱ्याची राजकीय हत्या करून पक्षाला काहीच मिळणार नसल्याचं देखील प्रकाश महाजन म्हणाले.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे :

दरम्यान, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकतं नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!