Share

Nana Patole | “संघाचा पंतप्रधान, संघाचाच भाजपाध्यक्ष, हे चालतं का?” ; नाना पटोलेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर परिवारवादाचे आरोप करत आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी परिवारवादाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने सगळेच पाप केलेले चालते, त्यांना संघाचा प्रधानमंत्री चालतो, संघाचा भाजपाध्यक्ष चालतो. मात्र गांधी घराण्याचे विचार त्यांना चालत नाहीत, त्यामुळे देशाचे विभाजन करून देश तोडण्याचे काम भाजपा करत असल्याचा टोला नाना पटोले यांनी भाजपाला लगावला आहे.

नाना पटोले म्हणाले, एकीकडे परिवार वादातील महेबुबा मुफ्ती यांच्याबरोबर युती करायला भाजपला चालते, मुलगा खासदार असलेल्या एकनाथ शिंदेंबरोबर यांना सरकार स्थापन करायला चालते. फक्त गांधी विचार, आणि काँग्रेसचे विचार भाजपला चालत नाहीत.

पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत-

पंकजा मुंडे म्हणाल्या की काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेश मंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा, अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही, असं मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!