Share

मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला – नाना पटोले

Published On: 

नागपूर : स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला असून लोणावळा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोपही यावेळी पटोले यांनी केलाय.

त्यांनतर आता नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. ‘मनगढत कहाण्या बनविण्याचं काम सुरू झालं आहे. मी परवा पुण्यात होतो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याचं कार्यकर्ते सांगत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दौरे सुरू आहेत. काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. त्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. हा रिपोर्ट केवळ राज्य सरकारकडेच नाही तर केंद्र सरकारडेही जात असतो. सर्व घडामोडींची माहिती केंद्र आणि राज्याकडे जात असते. ही भूमिका मी मांडली. मी अत्यंत प्लेनली बोललो होतो. त्याचा विपर्यास केला गेला, असं पटोले म्हणाले आहेत’.

दरम्यान, तत्पूर्वी या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. ‘नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरं भरलेलं आहे. त्यांना पाणी देखील जात नाही. त्यांना जेवण देखील जात नाही, असं नाना पटोलेंच्या बोलण्यावरून दिसतंय. ते इतके का घाबरले आहेत, हे त्यांनी सांगावे’, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते नागपुरात बोलत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!