🕒 1 min read
पुणे – अंधश्रद्धेला बळी पडून एक उच्चशिक्षित कुटुंबातील पतीने पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रघुनाथ येमुल याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चतुःशृंगी पोलिसांनी येमुलला अटक केली आहे.
पुण्यातील उद्योजक गणेश नानासाहेब गायकवाड यांना पत्नीविषयी अघोरी सल्ला देऊन लग्न मोडण्याच्या कटात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. अनिष्ट रूढी आणि अघोरी कलमान्वये चतु:शृंगी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
रघुनाथ येमुल गुरुजी यांनी फिर्यादी महिलेचे पती गणेश गायकवाड यांना ‘तुझी बायको पांढऱ्या पायगुणांची आहे. तिची जन्मवेळ चुकीची आहे, त्यामुळे ग्रहमान दूषित झाले आहेत. जर ही बायको म्हणून कायम राहिली तर तू आमदार होणार नाही, मंत्री होणार नाहीस. त्यामुळे तिला लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे. मी दिलेला लिंबू उतरविल्यावर तुझ्या मागची पीडा कायमची निघून जाईल.’ त्यानंतर पती गणेश यांनी बायकोवरून लिंबू ओवाळून टाकले होते. संसार मोडण्यासाठी अनिष्ट रुढी-परंपरा, अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे पुरवणी जबाबात फिर्यादी महिलेने नमूद केले आहे. गुन्ह्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर येमुल गुरुजींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.
हा संपूर्ण प्रकरण रघुनाथ राजाराम येमुल याच्या सांगण्यावरून घडल्याचं समोर आलं आहे. महिलेचा पती गणेश गायकवाड याला हे सर्व कृत्ये येमुलने करण्यास सांगितल्याचे फिर्यादी महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.येमुल गुरुजींचा राजकीय तसेच प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी स्नेह आहे. गुरुजींच्या दरबारात अनेकजण भविष्य पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे संबंधित प्रकरणात गुरुजीला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

