अकोला : शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा इथं भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुपारी हिंगणा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना,अचानक अर्धांग वायूचा सौम्य झटका आल्याने एकच गोंधळ उडाला.
अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृती चांगली असल्याची माहिती स्वःता मिटकरी यांनी दिली आहे. अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे,स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते व मित्रांना केली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्याया विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकड राहिली,माझ्या मनाची होतीया काहीली ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केल्यावर काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला,तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- पावसामध्ये सेल्फी घेणे पडले महागात; वीज कोसळल्याने 11 जण पडले मृत्यूमुखी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

