कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे जेणेकरुन कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनीही जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कारखाने, खासगी आस्थापना, बँका कंपन्या यांनी मानवी दृष्टीकोनातून लसीकरणात पुढाकार घ्यावा तसेच होम आयसोलेशन बंद करण्यात यावे. नागरिक, व्यापारी यांनी संयम बाळगावा, असे आवाहन करुन लवकरच जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख कमी होईल असा आशावाद हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.
मंत्री मुश्रीफ यांनी ऑक्सिजन पुरवठा, लसीकरण, जिल्ह्यातील पॉझिटीव्हिटीरेट टेस्टिंग, म्यूकर मायकोसिस आदींचा यावेळी विस्तृत आढावा घेतला. सध्या सीपीआरमध्ये 480 रुग्ण भरती असून त्यापैकी 378 रुग्ण कोविड आहेत. या दाखल रुग्णापैकी 75 रुग्ण व्हेटींलेटरवर तर 278 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
- पावसामध्ये सेल्फी घेणे पडले महागात; वीज कोसळल्याने 11 जण पडले मृत्यूमुखी
- हरारे कसोटीत बांग्लादेशचा झिंबाब्वेवर २२० धावांची विजय, महमुदुल्लाह सामनावीर
- डेवॉन कॉनवेने पटकावला जुन महिन्यातील आयसीसी सर्वोत्कष्ट खेळाडूचा पुरस्कार
- वीर बाजीप्रभु साकारण्यासाठी अंजिक्य देवने केलं ‘हे’ काम
- पराभवानंतर इंग्लडच्या चाहत्यांनी केली इटलीच्या समर्थकाना मारहाण; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

