Share

‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं, त्यांच्या प्रमुखांनीच पाळत ठेवली हे किती वाईट!’; भाजप नेत्याची बोचरी टीका

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणालेत.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघडीतील दुफळी यामुळे समोर येत असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना खोचक टोला लगावला आहे.

‘काँग्रेसने ज्या शिवसेनेला पाळलं आहे, त्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षावर पाळत ठेवणे किती वाईट! पटोले तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’ असा टोला भातखळकर यांनी लगावला असून हा गंभीर आरोप आहे; या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी देखील भातखळकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!