Share

“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, महागाईवरून नाना पटोलेंचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘कच्च्या तेलाच्या किंमतीत २६ टक्क्यांनी घट, तरीही आज पेट्रोलच्या दरात ८० पैशांची, तर डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ. आठवड्याभरात इंधनात ४.८० रुपयांची दरवाढ. वारे रे पाकिटमार मोदी सरकार’, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर २७ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली. तसेच ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तद्पश्चात ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!