Share

IPL 2022 GT vs LSG : हुडा, बदोनीमुळं लखनऊ सावरलं; गुजरातला मिळालं १५९ धावांचं आव्हान!

Published On: 

मुंबई : वानखेडे मैदानावर आयपीएलच्या दोन नवीन संघांचा सामना सुरू आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स तर केएल राहुलच्या नेतृत्वात लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आले आहेत. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या लखनऊने २० षटकात १५८ धावा केल्या. गुजरातकडून मोहम्मद शमीने तिखट मारा करत ३ बळी टिपले.

लखनऊचा डाव

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लखनऊला चांगली सुरुवात करू दिली नाही. त्याने कप्तान केएल राहुलला पहिल्याच चेंडूवर यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर शमीने क्विंटन डी कॉकचा (७) सुरेख त्रिफळा उडवला. यानंतर आलेल्या एविन लुईसचा शुबमन गिलने अप्रतिम झेल टिपला. २९ धावांत ४ फलंदाज बाद झाल्यानंतर दीपक हुडा आणि आयुष बदोनीने डाव सावरला या दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकापार पोहोचवले. हुडाने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली. राशिद खानने त्याला पायचीत पकडले. त्यानंतर कृणाल पंड्याने बदोनीसोबत धावा केल्या. १९व्या षटकात बदोनीने लॉकी फर्ग्युसनला षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात तो झेलबाद झाला. बदोनीने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावा केल्या. २० षटकात लखनऊने ६ बाद १५८ धावा केल्या कृणाल २१ धावांवर नाबाद राहिला. गुजरातकडून शमीने ३ तर वरूण आरोनने २ बळी टिपले.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कप्तान), शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, डेव्हि़ड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, राशिद खान, मोहम्मद शमी, वरूण आरोन.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, कृणाल पंड्या, एविन लुईस, दुष्मंथा चमीरा, दीपक हुडा, आयुष बदोनी, आवेश खान, मोहसिन खान, रवी बिश्नोई.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!