Share

IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स संघ पदार्पणाचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळत आहेत. या सामन्यात गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अप्रतिम मारा करत लखनऊचा कप्तान केएल राहुलला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले. यानंतर चाहत्यांना एक अद्भूत कॅच पाहायला मिळाली.

वेगवान गोलंदाज वरूण आरोन सामन्याचे चौथे षटक टाकत होता, यावेळी तिसऱ्या चेंडूवर लखनऊच्या एविन लुईसने हवेत फटका खेळला. शुबमनने मिड विकेटला पाठी धावत जात आणि हवेत सूर मारत अप्रतिम झेल टिपला. त्याचा झेल पाहून १९८३च्या वर्ल्डकपमध्ये कपिल देव यांनी घेतलेला झेल सर्वांना आठवला.

https://twitter.com/Cute_Ladka21/status/1508450618746470400

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात टायटन्स – हार्दिक पंड्या (कप्तान), शुबमन गिल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, डेव्हि़ड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, राशिद खान, मोहम्मद शमी, वरूण आरोन.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, कृणाल पंड्या, एविन लुईस, दुष्मंथा चमीरा, दीपक हुडा, आयुष बदोनी, आवेश खान, मोहसिन खान, रवी बिश्नोई.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!