मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. असे असतांनाच आता पुढील महिन्यापासून जीवनावश्यक औषधांच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘औषधांचा उत्पादन खर्च वाढल्याने ही दरवाढ अपरिहार्य होती आणि मागील दोन वर्षांपासून ती व्हावी अशी मागणी होती, असे औषध उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यात कदाचित तथ्य असेलही, पण अशा प्रत्येक दरवाढीसाठी सामान्य माणसाने पैसे आणायचे कुठून? पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत रोखून धरली होती, तशी औषध दरवाढही रोखली होती असेच आता म्हणावे लागेल. अन्यथा पेट्रोल-डिझेलपाठोपाठ औषधांच्या दरवाढीला मंजुरी दिली गेली नसती. आधीच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने जीएसटी, बचत खाते, फिक्स डिपॉझिट, एटीएमचे शुल्क इथपासून करप्रणालीपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. त्याचा बोजा सामान्य माणसाच्या खिशावरच पडणार आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘दुसरीकडे पीएफवरील व्याजदराला कात्री लावून केंद्र सरकारने सामान्य पगारदाराची भविष्यातील तरतूदही कमी केली आहे. म्हणजे दरवाढीचे तडाखे देत खिशातील असलेले-नसलेले पैसेही काढून घ्यायचे आणि निवृत्तीनंतर मिळणारी पुंजीही फार मिळणार नाही, अशी व्यवस्था करायची, असे प्रयोग सध्या सुरू आहेत’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “…पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय?”, संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल
- IPL 2022 : …अन् दीपक हुड्डाची धमाकेदार खेळी बघून कृणाल पंड्याही झाला खूश; वाजवल्या टाळ्या!
- IPL 2022 : ‘जानी दुश्मन’ कृणाल-दीपक झाले लखनऊच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग; नेटकऱ्यांचे मजेदार मीम्स व्हायरल!
- IPL 2022 : शुबमन गिलनं घेतलेला ‘हा’ कॅच पाहिलात, तर तुम्हाला कपिल देव यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही!
- VIDEO : मॅच सुरू होऊन दोन मिनिटं झाली अन्..! पाहा शमीच्या पहिल्याच चेंडूवर कसा आऊट झाला केएल राहुल!


