Share

उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण पाठीमाबा दर्शवला होता. तर आता कॉंग्रेस पक्षाने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शेतकरीविरोधी काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात उद्या २७ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रिय पाठिंबा असून मी स्वतः अकोल्याहून या बंदमध्ये सहभागी होणार आहे. हा बंद शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात असणार आहे’ असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले आहे.

तसेच कृषी कायदे बनवत असताना शेतकरी-कामगार यांचा सहभाग यामध्ये कसा होणार नाही याची पुरेपूर काळजी मोदी सरकारने घेतली आहे. जिथे आंदोलन सुरु आहे तिथून २५ किलोमीटरवर भिंत आणि खिळे लावण्याचं काम सरकारने केलं, जेणेकरुन मीडिया, पत्रकारांना त्यांच्यापर्यंत पोहचू येणार नाही. अश दडपशाही मोदी सरकारने केली आहे. असा घणाघात देखील नाना पटोले यांनी केली मोदी सरकारवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!