Share

हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे घोटाळे उघड करण्यासाठी कोल्हापूर दौरा करण्याचा निर्धार भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागच्या वेळी ऐन वेळेवर पोलिसांनी अडविल्यामुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला होता. या दौऱ्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा असे अव्हान सोमय्या यांनी पोलीस व आघाडी सरकारला दिले आहे.

उद्यापासून किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लज साखर कारखान्यात १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. पुढे महाविकास आघाडीने देखील आक्रमक होत सोमय्यांना कोल्हापुरात न जाता कराडमध्येच थांबवले. परंतु यावेळी कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे समर्थक आणि मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता याच्याही पुढे जाऊन मुरगूड शहरात सोमय्या यांना कायमच्या प्रवेश बंदीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.

मागच्या वेळी कोल्हापुर दौऱ्यासाठी निघण्याच्या तयारीत असलेल्या किरीट सोमय्या यांच्या घरासमोर १०० पोलिसांना तैनात करण्यात आले होते. तसेच त्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यालयात बंदी केले होते. त्यांना स्थानबद्ध केल्यानंतर विरोधी पक्षातून मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता हिंमत असेल तर उद्यापासून सुरु होणारा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा असे आव्हान त्यांनी आघाडी सरकारला दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!